मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका रात्रीस खेळ चाले भाग ३ मधील मुख्य भूमिका साकारणारे ‘अण्णा नाईक’ परत येणार, याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या कार्यक्रमाचे आधीचे दोन भाग देखील लोकप्रिय ठरले होते. या आधीच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामुळे अनेकजण नाराज झाले होते. त्यामुळे प्रत्येकजण अण्णांची आतुरतेने वाट बघत होता. अखेर २२ मार्च रोजी अण्णा नाईक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
पहिल्याच भागात अण्णांचा नेहमीचा दरारा पुन्हा अनुभवायला मिळाला आहे. ‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. तसेच या अबाहतील शेवंता हे पात्र देखील कमी काळात खूप लोकप्रिय झाले होते.
पुढील भागात शेवंत असेल कि नाही असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला होता. परंतु या भागात देखील शेवंता असल्याने आनंद व्यक्त केला आहे. आता ‘रात्रीस खेळ चाले ३ ‘ मध्ये काय असणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे.
पहिल्याच भागात केवळ अण्णा दिसले, तर फोटोत शेवंताची झलक पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्यात प्रेक्षक नाईकवाडा सांभाळणारी ‘माई’ आणि कुटुंबातील इतर मंडळी शोधत होते. या प्रोमोमध्ये माई वृद्ध दाखवलेल्या असून, त्या घराजवळ भांडी घासताना दिसल्या आहेत.
तर, माई वयस्कर झाल्या असून वाडा न विकण्याचं त्या ठरवतात. या वाड्यात त्यांच्या परिवाराच्या आठवणी असल्याचं त्या सांगतात. तर, दुसरीकडे अण्णा नाईकांचा मोठा मुलगा अर्थात भोळा माधव पूर्ण बदललेल्या रुपात पाहायला मिळाला. या दोघांची झलक अशा पद्धतीने दिसल्याने आता मालिकेत नेमकं काय घडणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानला कोरोनाची लागन
- ‘निगेटीव्ह’ लॅबचालकांना मनपाचा दणका, कोरोना चाचणी करण्यास घातली बंदी
- जिल्हा बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदासाठी मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीला लागले वेध
- पैठण कोविड सेंटरमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य, तर डॉक्टर करतात रुग्णांना दमबाजी
- माझे कुटुंब… माझी जबाबदारी…हे म्हणणे सोपे आहे पण घरी राहून काय खायचं..माती ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

