औरंगाबाद : शहरातील काही खासगी लॅबमधून कोरोना चाचण्या करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सदर लॅबचालक चाचणीसाठी अवाजवी दर लावत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, खासगी लॅबकडून पाहिजे तसा अहवालही नागरिकांना दिला जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिकेने खासगी लॅबचालकांना कोरोना चाचणी करण्यास बंदी घातली आहे.
औरंगाबाद शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग अधिक गतीने पसरतो आहे. रोज नव्याने हजारपेक्षा अधिक रूग्ण आढळत असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी पालिकेने पथके कामाला लावली आहे. यातच शहरात असलेल्या खासगी लॅबमध्येही कोरोना चाचण्यासाठी जाणार्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे.
शहरात दोन ठिकाणी खासगी लॅब आहेत. यातील एक लॅब समर्थनगरात तर दुसरी सुतगिरणी परिसरात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या खासगी लॅबमधून नागरिकांना पाहिजे तसा अहवाल दिला जात असल्याचे समोर आले आहे. त्यासासाठी अधिकचे शुल्कही नागरिकांकडून वसूल केले जात आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी याचे गंभीर दखल घेऊन खासगी लॅबला कोरोना चाचणीचा बंदी आदेश मंगळवारी जारी केला.
तसेच यापुढे रुग्णांच्या घरी जाऊन स्वॅब कलेक्ट करू नये, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. पालिकेच्या केंद्रात जाऊनच चाचणी करावे, असे आवाहनही केले आहे. पालिकेकडून प्राप्त अहवालानुसार सोमवारी शहरात या दोन्ही खासगी लॅबमधून तब्बल ५८८ जणांनी कोरोना चाचणी केली. आजवर खासगी लॅबमधून २७,३३० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३,७०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २३,६२६ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठण कोविड सेंटरमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य, तर डॉक्टर करतात रुग्णांना दमबाजी
- माझे कुटुंब… माझी जबाबदारी…हे म्हणणे सोपे आहे पण घरी राहून काय खायचं..माती ?
- देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या यादीत पुणे अव्वल, तर टॉप-१० मध्ये राज्यातील ९ जिल्हे
- १८ वर्षांवरील सर्वांनाच कोवीड लस द्या : काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशींची मागणी
- हौस म्हणून टेस्ट केली, पॉझिटिव्ह अहवाल येताच धूम ठोकली


