Share

वकिल वेळेत न पोहोचल्याने करुणा शर्मा यांनी कोर्टात स्वत:च मांडली बाजू

Published On: 

बीड : जिवे मारण्याचा प्रयत्न व अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाल्याने अटकेत असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर अरुण मोरेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली. दरम्यान, सरकारी पक्षाने करुणा यांच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयात करुणा यांचे वकील उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे करुणा यांनीच स्वत: युक्तिवाद करून आपली बाजू मांडली.

परळीत येऊन पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी फेसबुकवरुन सांगितले होते. त्यानुसार त्या रविवारी दुपारी परळीत पोहोचल्या. पण, मुंडे समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. वैद्यनाथ मंदिराजवळ त्यांना काही महिलांनी अडवले यानंतर त्यांच्यात व महिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी ‘जातीवाचक शिवीगाळ का करतेस’असा जाब विचारल्याने करुणा शर्मा यांनी बेबी छोटूमियां तांबोळी हिला खाली पाडून जखमी केले. तर, अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने पोटावर वार केल्याची फिर्याद घाडगे यांनी दिली. यावरुन करुणा शर्मा व मोरे या दोघांवर अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला.

यानंतर सोमवारी कोर्टात करुणा शर्मा यांना हजर करण्यात आले. मात्र, वकिल वेळेवर न पोहोचल्याने करुणा यांनीच स्वत:ची बाजू मांडली. त्या कोर्टात म्हणाल्या की, मी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र देऊन परळीत आले होते. श्रावण महिना असल्याने मला वैद्यनाथाचे दर्शन घ्यायचे होते. माझ्यावर जो अन्याय झाला त्याबाबत मला पत्रकारांशी संवाद साधायचा होता. मी मुंबईची राहणारी आहे. त्यामुळे समोरची महिला कुठल्या जातीची आहे हे मला कसे माहिती असणार. राजकीय दबावातून माझ्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे करुणा यांनी कोर्टासमोर सांगितले. पोलीस आणि करुणा यांचे म्हणणे ऐकून घेत कोर्टाने करुणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!