Share

कार्तिकचा ‘भूल भुलैया २’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यानंतर आता अनेक चित्रपट रिलीज होणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/CUWjjpXjv5G/?utm_source=ig_web_copy_link

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमधील कार्तिकचा लूक सध्या चर्चेत आहे. त्याने काळा चष्मा लावला आहे, हातात माळ घेतली आहे आणि हटके टी-शर्ट परिधान केला आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘२५ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

भूल भूलैया 2 हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि तब्बू व्यतिरिक्त कियारा आडवाणी, राजपाल यादव आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कार्तिक आर्यन या चित्रपटात एका तांत्रिकच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन  ‘फ्रेडी’ आणि ‘धमाका’ हा चित्रपटही दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!