Share

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, प्रचंड नुकसान; वडेट्टीवारांनी केंद्राकडे केली महत्वाची मागणी

Published On: 

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळांच्या परिणामामुळे राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातही पाऊस होत आहे.

आता नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे. यावर आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारकडे मदत मागणार असल्याचे सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून केंद्र सरकारने राज्याला 7 हजार कोटी रुपये मदत द्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह ऊस आणि अन्य पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मंत्री वडेट्टीवार यांनी मराठवाड्यातील नुकसान पाहणी केली. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारने सुद्धा राज्याला मदत द्यायला हवी असे सांगितले. या प्रकरणी विरोधी पक्षातील नेत्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान आता हवामान विभागाने आज आणि उद्या देखील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही अति मुसळधार पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!