Share

‘पद्मावत’चा विरोध करण्यासाठी जवानांनी अन्नत्याग करावा – करणी सेना

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- सुरुवातीपासूनच भन्साळींच्या ‘पद्मावत’ या स्वप्नवत प्रोजेक्टला असलेला करणी सेनेचा विरोध सुरूच आहे. अनेक मार्गांनी ‘पद्मावत’चा विरोध करणाऱ्या करणी सेनेने आता थेट सैन्यदलातील जवानांनाही या प्रकरणात खेचले आहे.‘पद्मावत’ला विरोध करण्यासाठी भारतीय सैन्यदलात असणाऱ्या क्षत्रिय समाजातील जवानांनी एका दिवसाच्या अन्नावर बहिष्कार टाकत अन्नत्याग करावा, असे आवाहन करणी सेनेच्या महिपाल सिंह मकराना यांनी केले आहे.

करणी सेनेची ही आक्रमक भूमिका आणि त्यांचा पवित्रा पाहता ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर संकटांचे सावट आल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सेन्सॉरच्या निर्णयांनाही बाजूला सारत आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या करणी सेनेने सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या प्रसून जोशी यांना जयपूरमध्ये येण्यास बंदी घातली आहे. जयपूरमध्ये आलात तर तुमचेही भन्साळींप्रमाणेच ‘स्वागत’ करु असा इशारा जोशी यांना देण्यात आला आहे.‘देशाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर असणाऱ्या जवानांनी राणी पद्मिनीच्या संरक्षणासाठी पुढे यावे. कारण हा तुमच्या बहिणींच्या सन्मानाचा प्रश्न आहे’, असे म्हणत मकराना यांनी ही अजब मागणी केली. सोबतच त्यांनी सरकारला नमवण्यासाठी जवानांना एका दिवसासाठी त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवण्याचेही आवाहन केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!