Share

“आम्ही सैनिकांना भाड्याने ठेवू शकत नाही”, ‘अग्निपथ’ योजनेवर भगवंत मान यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशात सध्या अग्निपथ योजनामुळे वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ भरती  योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. यावरच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही सैनिकांना भाड्याने ठेवू शकत नाही. वयाच्या २१ व्या वर्षी आपण त्यांना माजी सैनिक कसे बनवू शकतो? ते कठोर परिस्थितीत देशाचे रक्षण करतात. राजकारणी कधीच निवृत्त होत नाहीत फक्त सैनिक, जनता निवृत्त होते. आम्हाला भाड्याने लष्कराची गरज नाही. अग्निपथ योजना परत घेतली पाहिजे”, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे.

दरम्यान सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार असून तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना यात समाविष्ट केले जाणार आहे. तसेच महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतनही मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!