Share

वीजबिल माफ न केल्यास सरकारला पळता भूई करून सोडू – कर्णबाळा दुनबळे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय.

लॉकडाऊन काळात ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे त्यांना वाढीव दराने बिल आल्याची घटना गेले काही महिने घडत आहे. या मुद्द्यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वाढीव वीजबिलाबाबत विचार केला जाईल व ग्राहकांना दिलासा दिला जाईल असं सांगितलं होते. पण काही दिवसांपूर्वी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं.

त्यानंतर ही जनतेची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष ठाकरे सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.मनसेने या आंदोलनाच्या निमित्ताने वाढीव वीजबिलाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.मनसेने येत्या २६ नोव्हेंबरला मनसेकडून नव्या आंदोलनाची हाक दिली असून वाढीव वीजबिलाविरोधात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

आता आम्ही सरकारला हात जोडून सांगत आहोत पण जर सरकारने ऐकलं नाही तर आम्हांला हात सोडावा लागणार आणि मग सरकारला पळता भूई करून सोडणार असल्याची माहिती मनसेचे चेंबूर विभाग प्रमुख कर्णबाळा दुनबळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!