Share

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह बंगळुरूमध्ये आढळला, आत्महत्येचा संशय

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची नात तिच्या बंगळुरू येथील घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय सौंदर्या लटकलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी ‘अनैसर्गिक मृत्यू’चा गुन्हा दाखल केला आहे. सौंदर्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे, मात्र तपास सुरू आहे.

सौंदर्या ही बीएस येडियुरप्पा यांची मोठी मुलगी पद्मावती यांची मुलगी आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. सौंदर्या एक डॉक्टर होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ.सौंदर्या यांनी हे पाऊल का उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, भाजपनेते येडियुरप्पा यांची दुसरी मुलगी पद्मावती यांची मुलगी सौंदर्या हिचा विवाह त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉ. नीरज एस यांच्याशी २०१८ मध्ये झाला होता. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास नीरज ड्युटीवर निघाला होता आणि त्यानंतर दोन तासांनी सौंदर्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!