🕒 1 min read
औरंगाबाद: नव्याने विकसित झालेल्या खाम नदीपात्रात नुकतेच आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आदित्य सरोवरचे लोकार्पण करण्यात आले. मात्र या सरोवराबरोबरच या ठिकाणी अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योगा लॉन्स, इम्तियाज सूर्यकुंड, भागवत कमल तलाव या प्रकल्पांचे ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र या ठिकाणांना आयुक्त पांडेय यांनी दिलेल्या या नावांची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच चंद्रकांत योगा लॉन्सच्या बाजूलाच इम्तियाज सूर्यकुंड असल्याने यातून मोठ्या प्रमाणावर अर्थ काढले जात आहेत.
शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवन विकासासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून गेल्या एक वर्षाच्या अथक प्रयत्न व परिश्रमातून खाम नदीला गतवैभवाबरोबरच पर्यावरण पूरक आणि सुशोभीकरण, सौंदर्याकरण आकर्षक करून बालगोपाल व नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. येत्या २५ जानेवारी २०२२ रोजी या विकास कामाला एक वर्ष पूर्ण झाल्याने आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.
मात्र याठिकाणी देण्यात आलेल्या उद्यान, सरोवरांच्या नावाची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. महापुरुष, राष्ट्रीय नेते, स्वातंत्र्य सेनानी यांची नावे आत्तापर्यंत अनेक मार्गांना पर्यटन स्थळाला दिलेली आपण पाहिली आहेत. मात्र शहरातील स्थानिक राजकारणातील पक्षातील नेत्यांची नावे देणे म्हणजे ‘कमाल करते हो पांडेयजी’ असेच पांडेय यांच्या बद्दल बोलले जात आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रकल्पांकडे लक्ष द्यावे त्यामुळे अशा प्रकारची नावे देण्यात आल्याचा दावा पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी केला आहे.
या प्रकल्पांना दिली आहेत नावे
सतीश चव्हाण यांच्या नावे सतीश नाना-नानी पार्क, अंबादास दानवे यांच्या नावाने अंबादास फुलपाखरू उद्यान, आदित्य ठाकरे यांच्या नावे आदित्य सरोवर, चंद्रकांत खैरे यांच्या नावे चंद्रकांत योगा लॉन्स, अतुल सावे यांच्या नावे अतुल बाल उद्यान, प्रदीप जैस्वाल यांच्या नावे ओपन जिम, डॉ. भागवत कराड यांच्या नावे भागवत कमल तलाव, सूर्यकुंडाला खासदार इम्तियाज जलील यांचे नाव, व्हॉलीबॉल मेदानाला आमदार शिरसाट, डॉ. रफिक झकेरिया यांचे नाव नदी प्रकाशयोजनेला देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
-
“बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम…”, ‘त्या’ निर्णयावरून दरेकरांचे टीकास्त्र
-
भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर संजय राऊत म्हणाले…
-
“तीन चाकी सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं”, आ. कीर्तीकुमार भांगडिया
-
“महाभकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा ‘हा’ निर्णय”, भातखळकरांचे टीकास्त्र
-
“हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?”, ‘त्या’ निर्णयावरून चित्रा वाघ यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
