मुंबई: राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने (Big decision of High Court) रद्द केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने तसेच शिवीगाळ केल्याने आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याकारणाने या १२ आमदारांचे ५ जुलै २०२१ रोजी निलंबन करण्यात आले होते.
दरम्यान या निर्णयानंतर भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी अहंकारात शहाणपण गमावलं आहे. हा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा आहे. या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली आहे. याचे एका शब्दांत वर्णन म्हणजे सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं हो सकता! सर्वोच्च न्यायालयाचे आभार”, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आभार!
सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं हो सक्ता! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/HqbKzHYOqq
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 28, 2022
दरम्यान १२ आमदारांच्या निलंबनावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले होते. एक वर्षासाठी आमदारांचे निलंबन करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, अतुल भातखळकर, संजय कुटे, योगेश सागर, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, राम सातपुते, नारायण कुचे, बंटी भांगडिया अशी १२ आमदारांची नवे आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “ड्राय डे ला किराणा दुकान आणि सुपर मार्केट बंद ठेवणार का?” बावनकुळेंचा ठाकरे सरकारला सवाल
- “ठाकरे सरकारचा थोबाड फोडून घेण्याचा विश्वविक्रम… गाढव आणि ब्रह्मचर्य दोन्ही गेले”
- “हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?”, ‘त्या’ निर्णयावरून चित्रा वाघ यांचा टोला
- IPL 2022: आयपीएल ऑक्शन आधी माही पोहचला चेन्नईला ; जाणून घ्या काय आहे कारण
- “महाभकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा ‘हा’ निर्णय”, भातखळकरांचे टीकास्त्र


