बंगळूरू : कर्नाटक विधान परिषदेत काँग्रेसच्या आमदारांनी मंगळवारी तुफान राडा पाहायला मिळाला. सभापतींच्या खुर्चीत असलेल्या उपाध्यक्षांनाच थेट खाली खेचण्याएवढा तुफान राडा सभागृहात झाला. विधानपरिषदेचे उपाध्यक्ष सभापतींच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर काँग्रेस आमदारांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी या खुर्चीवर बसणं घटनाबाह्य असल्याचा त्यांचा दावा होता. यावरून सुरू झालेला गोंधळ शिगेला पोहोचला.
हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. मंगळवारी सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच काँग्रेस सदस्यांनी गोंधळाला सुरुवात केली. सभापतींच्या खुर्चीजवळ येऊन सदस्यांनी गोंधळ सुरू केला आणि अक्षरशः उपाध्यक्षांना खाली खेचलं. शेवटी सभागृहात तैनात असलेल्या मार्शल्सना मध्ये पडत त्यांना सावरावं लागलं. उपमुख्यमंत्री अश्वथनारायण आणि काँग्रेसचे आमदार यांच्यात सुरू झालेल्या वादावादीचं रुपांतर या अभूतपूर्व गोंधळात झालं.
कर्नाटक सरकारने मांडलेल्या गोवंशहत्या बंदी विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आपल्या सर्व सदस्यांसाठी व्हिप काढलं होतं. सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं, असं काँग्रेसचं व्हिप होतं. अशा भरगच्च सभागृहात हा राडा झाला. काँग्रेसने विधेयकाला विरोध करायचं ठरवलं आहे. पण काँग्रेसचे मित्र असलेल्या JDS ने विधेयक संमत करण्यापूर्वी समितीकडे पाठवण्याचा आग्रह धरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारतात फेसबुकवर मोदी सरकार आणि आरएसएसचे नियंत्रण
- संजय राऊतांची बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी; पडळकरांचा प्रहार
- गृहिणींची होणार कसरत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या ‘एवढी’ किंमतीत वाढ…
- पेट्रोलच काय चार्जिंगची देखील गरज नाही इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी; केवळ २४ तासात सर्व कार सोल्ड
- भास्कर जाधवांची दादागिरी मी एका दिवसात संपवली- निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

