चिपळूण:- कोरोनाच्या काळात चाकरमान्यांना गावी येऊ द्या, अशी मागणी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली. चाकरमानी गावी आल्यानंतर आमदार जाधव गायब झाले. त्यांना शोधण्याची वेळ प्रशासनावर आली. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची जबाबदारी मी घेईन, असे म्हणणाऱ्या आमदार जाधव यांनी पाच रुपयांचा मास्कही वाटला नाही. त्यांच्या मतदारसंघातील निम्यापेक्षा जास्त गावात मोबाईलची सेवा मिळत नाही. त्यामुळे गुहागरचा विकास करण्यात आमदार जाधव अपयशी ठरले आहेत, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात भाजपचा तालुका स्तरावरील मेळावा झाला. यावेळी निलेश राणे बोलत होते. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची दादागिरी मी एका दिवसात संपवली. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांना अडवण्याची भाषा करू नका. आम्ही ठरवू तेव्हा तुम्हाला अडवू, असे आव्हान माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला दिले आहे.
दरम्यान, प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांना कर्मदळिद्री असे म्हटले. मी तर राऊत यांना पूर्ण दळिद्री म्हणेन. मोदी लाटेत ते निवडून आले. नाही तर त्यांची निवडून येण्याची पात्रता नव्हती. हिम्मत असेल तर धनुष्यबाण बाजूला करून निवडणूक लढवा. म्हणजे तुमची पात्रता काय ती समजेल, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने- दरेकर
- मोदी सरकारसाठी शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी तर भांडवलदार हे उत्तम मित्र- राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

