🕒 1 min read
मुंबई- दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आणि राज्यात आणीबाणी लागू करा अशा विरोधकांच्या मागणीवरुन शिवसेनेने भाजपवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि गोपिचंद पडळकर अशा भाजप नेत्यांनावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज जहरी टीका करण्यात आली आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पडळकर यांनी खास धनगरी पेहराव करत ढोल वाजवून आंदोलन केलं होतं. त्यावरुन सामनाच्या अग्रलेखात पडळकरांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. त्याबाबत पडळकर यांना विचारलं असता पडळकर यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सामना वृत्तपत्र आपण वाचत नाही. हा सामना आता जुना सामना राहिला नाही तर व्यापारी सामना झाला आहे. बाळासाहेबांच्या काळातील सामना वेगळा होता. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा घणाघाती आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
दरम्यान, कालपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोल वादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी फेकूचंद यांची मागणी होती, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने- दरेकर
- मोदी सरकारसाठी शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी तर भांडवलदार हे उत्तम मित्र- राहुल गांधी

