मुंबई : बॉलीवुडचा आघा़डीचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याचे धर्मा प्रॉडक्शन हे आर्थिक संकटात सापडले आहे. नेटफ्लिक्स साठी ‘सर्चिंग फॉर शीला’ आणि ‘अजीब दास्तान्स’ या कलाकृतच्या गुणवत्तेमुळे लायका प्रॉडक्शनने धर्मा प्रॉडक्शनसोबत झालेल्या करारावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धर्मा प्रॉडक्शन आर्थिक संकटात सापडले आहे.
लंडन येथील मोबाईल कंपनीने लायका प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. या कंपनीने घोषणा केलेल्या ‘इंडियन’ या चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुर्घटनेनंतर या चित्रपटाचे चित्रिकरण बंद करण्यात आले होते. या दुर्घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा काम सुरू होईल असा विश्वास होता. मात्र तसे झाले नाही यामागे कारण आहे लायका प्रॉडक्शन हे आर्थिक संकटात असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करण जोहरसोबत लायका कंपनीने जो करार केला आहे तो अडचणीत आला आहे. करोनाच्या दुस-या लाटेमुळे कंपनीने त्यांच्या धोरणांवर पुनर्विचार करण्याचे ठरवले आहे. यात धर्मा प्रॉडक्शनची सहकंपनी धर्माटिकनेही ज्या पद्धतीने ‘सर्चिंग फॉर शीला’ आणि ‘अजिब दास्तान्स’ चे निर्मिती केली आहे, त्यामुळे ब्रँडचे नुकसान झाले आहे. अर्थात याबाबत धर्मा प्रॉडक्शन अथवा लायका प्रॉडक्शनने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अभ्यागतांना प्रवेश बंद
- आता हेच बाकी होते, म्हणे ‘वकिलांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्या’
- मोठी बातमी : ‘राज्यात १८ वर्षांपुढील नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्यावर एकमत’
- उस्मानाबादेत मृतांच्या आकडेवारीत तफावत,कोविड सेंटरमध्ये समन्वयाचा अभाव
- ‘या’मुळे माजी क्रिकेटपटू खा.गौतम गंभीरने मानले ‘खिलाडी’चे आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

