Share

कपिल शर्मा शो फेम सुनील ग्रोवरवर हार्ट सर्जरी; डॉक्टर म्हणाले “आता प्रकृती उत्तम.. ”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘कपिल शर्मा कॉमेडी शो’ मधून घरोघरी लोकप्रिय झालेला कॉमेडियन सुनील ग्रोवर (sunil Grover) सर्वांना खळखळून हसायला लावलं. त्याने बॉलीवूडमध्ये बरेच चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही भूमिका वठविल्या आहेत. नुकतच त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया (Heart Surgery) करण्यात आली असून डॉक्टरांनी त्याच्या आरोग्याबद्दल माहिती दिली आहे. त्याच्या तब्येतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

दरम्यान बॉलीवूड इंडस्ट्रीमधील कॉमेडियन सुनील ग्रोवरवर (Sunil Grover) मुंबईतील ‘एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’मध्ये हृदय शस्त्रक्रिया (Heart Operation) करण्यात आली. ही धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांसह सर्वांना धक्का बसला आहे. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीलचे आरोग्याबाबत म्हणाले की, तब्येत ठीक असून तो उत्तम प्रतिसाद देखील देत आहे. कॉमेडीयन सुनील ग्रोवर यानं गेल्याच आठवड्यात त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला होता. तसेच या पोस्टवर चाहत्यांनी देखील कमेंट, लाईक केली होती.

https://www.instagram.com/p/CZd8hD9qk9T/?utm_source=ig_web_cpy_link

विशेष म्हणजे सर्वांचे मनोरंजन करणारा विनोदवीर सुनील ग्रोवर हा त्याच्या आरोग्याबाबत नेहमीच जागरुक राहणारा कलाकार आहे. मात्र त्याच्या अचानक प्रकृतीबद्दल माहिती मिळताच सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यास गेल्या महिन्यात फिल्मफेअर सर्वोत्तम कलाकार ओटीटी पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. हा पुरस्कार ‘सनफ्लावर’ या वेबसीरिजसाठी त्याला देण्यात आला होता. त्याच्याहार्ट सर्जरीनंतर पुन्हा लवकरच मनोरंजन क्षेत्रात त्याचे आगमन व्हावं म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियावर त्याला कमेंट करून दिलासा दिला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!