Share

मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त, आमदार पाटलांची उद्धव ठाकरेंवर स्तुतिसुमने

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, तरीही उद्धव ठाकरे यांनी दु:ख बाजूला सारुन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतची नियोजित बैठक पार पाडली. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे. स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे. अशी स्तुतिसुमने आता मुख्यमंत्र्यांवर उधळण्यात येत आहेत.

मानलं मुख्यमंत्री साहेब ! घरचं दुखः बाजूल ठेवून घेतली शिक्षण विभागाची बैठक

दरम्यान, माधव पाटणकर यांच्या निधनाची बातमी कळताच मी शिक्षण आयुक्तांना आजच्या बैठकीबाबत विचारणा करण्यासाठी मेसेज केला. तेव्हा शिक्षण आयुक्तांनी आजची बैठक नियोजित वेळेप्रमाणे सुरु असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षणासंदर्भात तुमचा आणि काही तज्ज्ञांचा उल्लेख केल्याचे आयुक्तांच्या या मेसेजेमध्ये लिहले होते, असे आमदारकपिल पाटील यांनी सांगितले आहे. पाटणकर आणि ठाकरे कुटूंबियांच्या दुःखात आपण सारे सहभागी आहोत. अस पाटील म्हणाले.

तर घरात दुःखाचा आघात झाला असताना मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागासोबत ठरलेली व्हीडिओ कॉन्फरन्स रद्द केली नाही. ती पूर्ण पार पाडली. इतर बैठकाही घेतल्या. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे, स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे, दरम्यान, आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत तयार केलेल्या आराखड्याला मंजुरी दिली. यानुसार जुलै महिन्यापासून टप्प्याटप्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत.

मोठी बातमी : रुग्ण संख्यात झपाट्याने वाढ झाल्याने ‘या’ राज्याने लॉकडाऊन केला अधिक कडक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!