Share

मानलं मुख्यमंत्री साहेब ! घरचं दुखः बाजूल ठेवून घेतली शिक्षण विभागाची बैठक

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, तरीही उद्धव ठाकरे यांनी दु:ख बाजूला सारुन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतची नियोजित बैठक पार पाडली. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे. स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे. अशी स्तुतिसुमने आता मुख्यमंत्र्यांवर उधळण्यात येत आहेत.

सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे – अमित शहा

घरात दुःखाचा आघात झाला असताना मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागासोबत ठरलेली व्हीडिओ कॉन्फरन्स रद्द केली नाही. ती पूर्ण पार पाडली. इतर बैठकाही घेतल्या. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे, स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे, दरम्यान, आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत तयार केलेल्या आराखड्याला मंजुरी दिली. यानुसार जुलै महिन्यापासून टप्प्याटप्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत.

‘महाविकास आघाडीने शेट्टींना मुख्यमंत्री करावं, मी स्वतः त्यांची मिरवणूक काढेन’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!