Share

मोठी बातमी : रुग्ण संख्यात झपाट्याने वाढ झाल्याने ‘या’ राज्याने लॉकडाऊन केला अधिक कडक

Published On: 

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 80 लाखाच्या जवळपास पोहोचली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, गेल्या 24 तासांत 1 लाख 22 हजार 298 नवीन प्रकरण पुढे आल्यानंतर, जगातील कोरोना रुग्णाची संख्या वाढून 79,82,822 झाली आहे. त्याच वेळी, या साथीच्या आजारामुळे 4,35,166 लोकांचा जीव गेला आहे.

देशभरात देखील कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यात दिल्ली, महाराष्ट्र या राज्यांबरोबरच तामिळनाडूमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. तमिळनाडूच्या 4 जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 19 जून ते 30 जून या दरम्यान हा लॉकडाऊन असले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तामिळनाडू सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नई, तिरुवेलूर, कांचीपुरम, जिंगलपेठ या भागात कडक लॉकडाऊन असेल. यामध्ये रिक्षा, बस सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. सरकारी कार्यालयात फक्त 33 टक्के हजेरी असेल, तर अत्यावश्यक सेवांची दुकान सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहणार आहेत.

मानलं मुख्यमंत्री साहेब ! घरचं दुखः बाजूल ठेवून घेतली शिक्षण विभागाची बैठक

दोन महिन्यांच्या देशव्यापी लॉकडाऊन केल्यामुळे देशावर घोंघावत असलेले कोरोना संकट नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पुढे ढकललं गेलं आहे. भारतात करोना संकट नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परमोच्च बिंदूवर पोहोचेल आणि त्यावेळी विलगीकरण तसेच आयसीयू खाटांची आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल, असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पुढाकाराने करण्यात आलेल्या एका अभ्यासात काढण्यात आला आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतर असा निष्कर्ष काढला जात आहे.

सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे – अमित शहा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!