नवी-दिल्ली : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच या मुद्द्यावरून आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार(Kanhaiya Kumar) यांनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही पण त्यांना आपल्याच देशात फिरायला भीती वाटते, असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.
गोव्यात युवा स्पंदन या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलत असतांना पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या आरोपावर बोलत असतांना म्हणाले की,’मागील दोन दिवसांपासून पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली असे टीव्हीवर दाखवत आहेत. पण मोदींकडे तर ५६ इंचची छाती आहे, तर मग त्यांना घाबरण्याची गरज काय?’. तसेच जर सुरक्षेत त्रुटी असतील तर तुम्ही पंतप्रधान आहात, तुमच्याकडे सरकार आहे. गृहमंत्री तुमचे मित्र आहेत, विशेष सुरक्षा पथक त्यांच्या अंतर्गत आहेत. तुम्ही तपास करून सुरक्षेत कुठे चूक झाली हे शोधा. पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते’, असे ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ही सर्व नौटंकी असून यांना आधीपासून माहिती आहे की पंजाबमध्ये गावागावात भाजपाच्या स्थानिक नेत्यांनाही गावात घुसू दिले जात नाहीये. तर पंतप्रधान मोदींना येऊ दिले जाईल का? हे माहिती असूनही यांनी पंजाबमध्ये कार्यक्रम ठरवला. त्यांना वाटलं मिनाक्षी लेखी गेल्यात त्या ट्रक भरून लोकं गोळा करतील, पण लोक आलेच नाहीत. लोकांनी ७० वर्षांपासून लोकशाहीची चव चाखली आहे. त्यामुळे आता ट्रक पाठवून ५०० रुपये देऊन तुम्ही गर्दी करू शकत नाही. हे उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतं, पंजाबमध्ये नाही’, असेही कन्हैया यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- …त्यामुळे कॅ.अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत
- ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

