Share

कोरोनामुक्त होताच कंगनाचा मुंबईला ‘रामराम’

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.

यातच आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील कोरोनाची लागण झाली होती. तिने स्वतः याबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली होती. पण आता तिने कोरोनावर मात केली आहे. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता कंगना कोरोनातून बरी झाली आहे आणि आपल्या मनालीतल्या घरी रवाना झाली आहे. तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CPFM1TPjH1H/?utm_source=ig_web_copy_link

इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत तिने कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तिने सांगितले होते. मात्र, कोरोनावर कशी मात केली सांगितलं तर अनेकांना वाईट वाटेल म्हणून मी सांगणार नाही अस म्हणतं तिने एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्टमध्ये असं म्हंटली आहे की, ‘नमस्कार आज मी कोरोना निगेटिव्ह झाले. मला खूप काही सांगायची इच्छा आहे की मी कोरोनाला कसं हरवलं पण मला सांगण्यात आलं आहे की कोरोनाच्या चाहत्यांना नाराज करू नको.’ तिची हो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!