Share

अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘भूत पोलीस’ ओटीटी प्लटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Published On: 

मुंबई :  संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे बिकट परिस्थिति निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून अनेक भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात अनेकांना याचा मोठा फटका बसला. मनोरंजन क्षेत्राला देखील याचा चांगलाच फटका बसला आहे. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे निर्मात्यांना चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावे लागत आहेत. आता अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘भूत पोलीस’ देखील ओटीटी प्लटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटगृहे नंतर आता ओटीटी प्लटफॉर्मवर देखील चित्रपटाना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CL02O02B4D5/?utm_source=ig_embed&ig_rid=76ed881a-a5e0-4ccd-94ff-f79f0e77fc1b

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले. हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र  सध्याची परिस्थिती पाहाता निर्माते रमेश तौरानी यांनी ‘भूत पोलीस’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटात सैफ अली खानसोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘भूत पोलीस’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. हॉरर कॉमेडी स्टोरी असल्यामुळे काही वेगळे पाहायला मिळणार यासाठी अनेकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!