Share

कंगनाने केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे आणखी एक तक्रार दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. काही काळापूर्वी तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे देशभरात तिच्यावर बरीच टीका झाली होती. कंगनाने ‘भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं.’ असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. आता कंगनावर याबाबत आणखी एक तक्रार (complaint) दाखल करण्यात आली आहे.

अभिनेत्री कंगनाच्या त्या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र निषेध ही झाला. तसेच तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कारही परत घेण्याची मागणीही झाली होती. मात्र आता याच वक्तव्यामुळे कंगनाच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. २८ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेस जनरल सेक्रेटरी भरत सिंह (Mumbai Congress general secretary Bharat Singh) यांनी कंगनाच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार विले पार्ले पोलीस ठाण्यात वकील आशिष राय आणि अंकित उपाध्याय यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/CWA-ey-sIUN/?utm_source=ig_web_copy_link

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ‘कंगनाचं हे वादग्रस्त वक्तव्य एका मुलाखतीद्वारे जगभरात पोहोचलं होतं. तिच्या या वक्तव्यामुळे देशाचे नागरिक, स्वतंत्र लढ्यात आपले प्राण गमावणारे सैनिक आणि नेते यांच्या सन्मानाला ठेच पोहोचली आहे. तिचं हे विधान देशाच्या विरोधात आहे तसेच देशात दंगली आणि दहशतवाद भडकवणारं आहे.’ आता या तक्रारीनंतर पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!