Share

भारत बंद विरोधात कंगना म्हणाली…

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ट्वीट केल्यामुळे चर्चेत आहे. याचवरुन तिच्यात आणि अभिनेता दिलजीत दोसांजमध्येही ट्विटर वॉर झालं होतं. अशातच आता कंगनाने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ संदर्भात ट्वीट केलं आहे.

कंगना रनौत ‘भारत बंद’च्या विरोधात आहे. अशातच तिने एका वेगळ्या अंदाजात भारत बंदचा विरोध केला आहे. कंगना रनौतने सद्गुरूंचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये आंदोलनाबाबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना कंगनाने लिहिलं आहे की, आओ भारत को बंद कर देते हैं, यूँ तो तूफानों कि कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज मरती है हर उम्मीद यहाँ, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकडा अब तुम भी माँग लो, आजाओ सडक पे और तुम भी धरना दो, चलो आज यह किस्सा ही खत्म करते हैं.”

कंगनाने या ट्वीटला सोशल मीडिया युजर्सच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. तर अनेक युजर्स कंगनाच्या या ट्वीटवर टीकाही करत आहेत. तसेच अनेकांनी कंगनाने घेतलेली भूमिका चुकीची असल्यांचं म्हणत आहेत.

दरम्यान कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेबाबत ट्विट केलं होतं की, ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे’.कंगनाच्या या ट्विट मुळे सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत होता या ट्विट मुळे कंगना बरीच ट्रोल झाली नंतर कंगना कडून हे ट्विट डिलीट करण्यात आले होते.

कंगनाच्या ट्वीटनंतर अभिनेता दिलजीत दोसांजने कंगनावर टीका करत ट्वीट केलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये ट्विटर वॉर झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाहीतर, इतरही सेलिब्रिटींनी कंगनाचं हे ट्वीट चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. तसेच अनेकांनी कंगनाला खडे बोलंही सुनावले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!