मुंबई : गेले ८ महिने राज्यासह देशात कोरोनाने कहर माजवला आहे. सद्या कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त असून हा रोग मुळासकट नष्ट व्हावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आज राज्यात कोरोनाचे ७३४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये ३ हजार पर्यंत घसरलेला दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा ७३४५ पर्यंत गेला आहे.
तर, ३ हजार ७५ कोरोनाबाधितांनी मात केली असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनमुक्तांचा आकडा १७ लाख ३० हजार ७१५ इतका झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार ७५ हजार ७६७ ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३.९८ टक्के इतके आहे.
https://twitter.com/rajeshtope11/status/1335950198690828289
कोरोना लसीचा मुहूर्त ठरला?
पुढच्या थोड्याच दिवसांत, 2021 च्या आधीच भारतात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. CNBC ने दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह वृत्तानुसार, पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि फायझर या कंपन्यांनी लशीच्या वापराला परवानगी देण्यासंदर्भात DCGI कडे अर्ज केला आहे. तर, एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लशीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन म्हणजेच 25 डिसेंबरचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 22 ते 26 डिसेंबरदरम्यान या दोन्ही लशींना परवानगी मिळून देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर आपण शेवटचे आंदोलन करण्यास पुन्हा मैदानात उतरणार’; अण्णा हजारेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जातील, राजेश टोपेंचे आश्वासन
- नवे कृषी कायदे म्हणजे अंबानी-अदानींना पायघड्याच! – राजू शेट्टी
- ‘भारत बंद’ला प्रतिसाद मिळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा
- शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंद दरम्यान काय सुरू, काय राहणार बंद ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

