🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.
दरम्यान, भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहालच्या कुटुंबावर कठीण परिस्थिती ओढावली आहे. युजवेंद्र चहालच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. आर अश्विन पाठोपाठ आता युजवेंद्र चहलच्या घरी देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. युजवेंद्रच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आलं होतं.
कुटुंबीयांच्या काळजीपोटी आर अश्विनने चौदाव्या पर्वातून माघार घेतली होती. असाच विचार मी देखील करत होतो. आई बाबांना कोरोना झाल्यामुळे मी आयपीएलमधून ब्रेक घेणार होतो, असं युजवेंद्र चहलने सांगितलं. नुकतंच त्याने याबाबत भाष्य केलंय.
“जर आयपीएलचं 14 पर्व स्थगित झालं नसतं तर मी आयपीएल स्पर्धा सोडली असती, असं युजवेंद्र चहलने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. आयपीएलचं पर्व सुरु असताना माझ्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान त्यांची तब्येत खराब झाली होती. त्यांना गुरुग्रामच्या एका रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. त्यामुळे मी चिंतेत होतो. आर अश्विनने जसा आयपीएलची स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला अगदी तशाच पद्धतीने मी देखील निर्णय घेण्याच्या विचारात होतो. आयपीएल स्पर्धा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे स्थगित झाली. जर स्पर्धा स्थगित झाली नसती तर तर मी सोडली असती”, असं इमोशनल कारण चहलने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसजी, लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा ? – सचिन सावंत
- ‘मुख्यमंत्री साहेब…चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता’
- राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्त्या कश्या रखडवल्या? नवाब मलिक म्हणाले…
- संचालक भरती प्रक्रियेत ऊर्जामंत्र्यांचा हस्तक्षेप सुरूच; विश्वास पाठक यांचा गंभीर आरोप
- ‘कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’चा प्रचार करण्यात येत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

