बीड: येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा निष्काळजीपणाचा कळसच झालाय. ऑक्सिजन बंद पडलं आहे हे सांगून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलं. निदान ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची तरी नित काळजी घ्या, असं म्हणायची वेळ आली आहे. ऑक्सिजन बंद पडलंय हे शेवटी त्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांना फोन करून सांगावे लागले. त्यानंतर ऑक्सिजन सुरु करण्यात आले. या प्रकारामुळे दोन परिचारिकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा बंद पडला, केवळ त्याच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क होता याची माहिती देऊनही परिचारिकांकडून दुर्लक्ष केले गेले. अखेर नातेवाइकांना रुग्णाने फोन करून आॅक्सिजन बंद पडल्याची माहिती दिली. वरिष्ठांपर्यंत हा प्रकार गेल्याने सीईओ, सीएस, एसीएस यांनी धाव घेतली. वॉर्ड क्रमांक सहा मध्ये गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही परिचारिकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते यांनी दिले आहेत.
वडवणी तालुक्यातील १९ वर्षीय तरुणावर वॉर्ड क्र. सहामध्ये उपचार सुरू आहेत. त्याला अॉक्सिजन लावला आहे. गुरुवारी रात्री त्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला. याची त्याने कर्तव्यावरील दोन परिचारिकांना कल्पना दिली मात्र त्यांनी याकडे दूर्लक्ष केले होते. परिचारिकांची चूक निदर्शनास आली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन्ही परिचारिकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची ही गैरसोय म्हणल्यावर इतर रुग्णांचे जीव धोक्यात आहे की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- वयाच्या ४५व्या वर्षी ‘या’ खेळाडूने केली शतकीय खेळी, चौकार आणि षटकारांचा पाडला पाऊस
- मोदी सरकार ‘ट्विटर’च्या भूमिकेवर नाराज, एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला
- आयपीएल स्थगित झाली नसती तर मी पण स्पर्धा अर्ध्यातून सोडली असती : युजवेंद्र चहल
- काँग्रेस राज्यभरात देणार १११ ॲम्ब्युलन्ससह ६१ लाख मास्क, नाना पटोले यांची माहिती
- बार्ज दुर्घटना प्रकरणी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा – शेलार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

