Share

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) नवी जबाबदारी मिळाली आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड करण्यात आली आहे.

त्याच्या आधी टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार आणि गांगुलीचा सहकारी खेळाडू अनिल कुंबळे याने हे पद भूषवले होते. कुंबळे जवळपास नऊ वर्षे या पदावर राहिले. क्रिकेट समितीचे काम खेळाच्या अटी आणि नियमांचे निरीक्षण करणे आहे. अनिल कुंबळेने या पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता आणि त्यापेक्षा जास्त काळ ते पदावर राहू शकत नव्हेत. त्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले.

गांगुली यापूर्वी आयसीसी क्रिकेट समितीमध्ये निरीक्षक पदावर होता. गांगुलीने भारतासाठी एकूण 113 कसोटी, 311 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 7212 कसोटी आणि 11363 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. गांगुलीच्या खात्यात 32 कसोटी आणि 100 एकदिवसीय विकेट्स आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!