Share

‘…आणि रात्री स्त्रीवर बलात्कार करतात’; वीर दासच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात तक्रार दाखल

Published On: 

मुंबई : अभिनेता वीर दास आणि स्टँड-अप कॉमेडियन याने अमेरिकेतल्या शोमध्ये भारतीयांबद्दल वक्तव्यावरून सध्या देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी, वीर दासच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅडव्होकेट आशुतोष दुबे, भाजप-महाराष्ट्राचे कायदा सल्लागार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

अलीकडेच वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. वॉशिंग्टन डी सी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. त्यात त्याने म्हटले, मी अशा भारतातून येतो जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो. सध्या त्याच्या वक्त्याव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

यानंतर सध्या अनेक भारतीयांनी त्याच्यावर टिका केली आहे. तर अनेकांनी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तसेच यावेळी त्याने मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्‍यांवर धावून जात असल्याचे म्हंटले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!