Share

न्यूझीलंडला मोठा धक्का: केन विल्यमसननंतर आता काईल जेमिसननेही टी 20 मालिकेतून घेतली माघार 

Published On: 

जयपूर : भारतासोबत बुधवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधार केन विल्यमसननंतर आता वेगवान गोलंदाज काईल जेमिसनही टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज संध्याकाळी पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी जेमिसनने T20 मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी जेमिसनच्या माघारीची माहिती दिली आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंडला भारतासोबत दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे.

स्टेड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘केन विल्यमसन आणि काइल जेमिसन यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आहे की ते T20 मालिकेत खेळणार नाहीत. ते दोघेही कसोटी सामन्यांची तयारी करतील आणि मला वाटते की तुम्हाला असे दिसून येईल की कसोटी संघातील इतर काही खेळाडू देखील संपूर्ण मालिकेसाठी खेळणार नाहीत.

जेमीसनच्या आधी कर्णधार केन विल्यमसननेही टी-२० मालिकेतून माघार घेतली होती आणि कसोटी मालिकेसाठी तयार होण्यासाठी मी टी-२० मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले होते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये तर दुसरी कसोटी ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे.

न्यूझीलंड हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता आहे. किवींनी या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडमधील साउथहॅम्प्टनमध्ये भारताचा आठ गडी राखून पराभव करून पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली होती.

https://www.instagram.com/p/CWWTCdxNQIc/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!