मुंबई : जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार ‘ग्रॅमी अवॉर्ड’ नुकताच लास वेगास येथे पार पडला. या कार्यक्रमात संगीत जगताशी निगडित अनेक व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी रिकी केज आणि फाल्गुनी शाह या दोन भारतीय संगीतकारांचाही गौरव करण्यात आला. मात्र या सोहळ्यात स्वर कोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही, त्यामुळे भारतीयांनी या पुरस्कार सोहळ्यासाठी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. त्याचवेळी आता कंगना राणौतचाही यावर संताप उफाळून आला आहे. कंगना राणौतने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने ग्रॅमी पुरस्कारावर टीका केली आहे.
एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनाने वेस्टर्न अवॉर्डवर बहिष्कार टाकल्याबद्दल सांगितले. कंगना रणौतने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही आंतरराष्ट्रीय असल्याचा दावा करणाऱ्या आणि दिग्गज कलाकारांना त्यांच्या जाती किंवा विचारसरणीमुळे दुर्लक्षित करणाऱ्या कोणत्याही स्थानिक पुरस्काराविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे.’
याच्या पुढे कंगना रणौतने लिहिले की, ‘जाणूनबुजून साइडस्टेप्स’. भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात ऑस्कर आणि ग्रॅमी दोन्ही अयशस्वी ठरले आहेत. जागतिक पुरस्कार असल्याचा दावा करणाऱ्या या पक्षपाती स्थानिक कार्यक्रमांवर आपल्या माध्यमांनी पूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे.
कंगना राणौतच्या आधी अनेक सोशल मीडिया यूजर्सनीही ‘ग्रॅमी अवॉर्ड’ला फटकारले आहे. तथापि, ग्रॅमीपूर्वी भारतीय गायिका लता मंगेशकर यांचे नाव ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते. यावेळीही भारतीय लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता.
महत्वाच्या बातम्या :


