Share

ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाहचं पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संगीतातील सर्वात लोकप्रिय पुरस्कार ‘ग्रॅमी अवॉर्ड्स’ सोमवारी लास वेगासमध्ये संपन्न झाला. या अवॉर्ड शोमध्ये भारतीय वंशाच्या गायिका फाल्गुनी शाहला सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अवॉर्ड शोनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट टाकून गायिकेचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटपासून प्रत्येकजण फाल्गुनी शहाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला न्यूयॉर्कमधील या गायिकेबद्दल काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत.

कोण आहे फाल्गुनी शाह?

‘फालू’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या फाल्गुनी शाहला ग्रॅमी अवॉर्ड्स 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बम श्रेणीसाठी दुसऱ्यांदा नामांकन मिळाले. ग्रॅमी पुरस्कारांसाठी दोनदा नामांकन मिळालेली ती एकमेव भारतीय वंशाची महिला आहे.  यापूर्वी, तिचा फालू बाजार हा अल्बम 2018 च्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये नामांकित झाला होता. मात्र, यावर्षी तिने प्रथमच ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे.

एआर रहमान यांच्यासोबत केलेय काम

फालूने 2009 मध्ये टाइम 100 गालामध्ये विशेष उपस्थिती लावली होती. भारतीय-अमेरिकन गायिकेने टाइम मासिकाच्या वार्षिक उत्सवात स्लमडॉग मिलेनियर संगीतकार एआर रहमान यांच्यासोबत हे गाणे गायले होते. नोव्हेंबर 2009 मध्ये, भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या पहिल्या स्टेट डिनरमध्ये एआर रहमान यांच्यासोबत पुन्हा गाण्यासाठी फालू यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. 2015 मध्ये, इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडियाने फालूला 20 सर्वात प्रभावशाली जागतिक भारतीय महिलांपैकी एक म्हणून नाव दिले.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 दरम्यान चेतेश्वर पुजाराला बसला ‘मोठा’ धक्का; रशिया-युक्रेन युद्धामुळं त्याच्यासोबत झाला ‘असा’ प्रकार!

“…याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही”, अविनाश जाधवांचा हल्लाबोल

“त्यांना भोंगा, मशीद, मुस्लमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की…”; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर

“महाराष्ट्र पेटवू नका”, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती

“पवार साहेब काय आहेत हे एकदा मोदीजींना विचारा”, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!