🕒 1 min read
नागपूर – शहरातील कळमना भागातील राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाण पुलाचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेचे बुधवारी शहरात राजकीय पडसाद उमटले. या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप करत एनएचआय व भारतीय जनता पक्षाचा निषेध करत संबंधित अधिकारी, कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करून शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आम आदमी पक्षाने आंदोलन केले. या दुर्घटनेवरून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून राजकारण सुरू झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-एनएचआयने १९ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील पारडी उड्डाणपुलाचा एक भाग कोसळण्यामागील कारणांची चौकशी करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समिती या घटनेची चौकशी करेल आणि समितीने अहवाल सादर केल्यानंतर आवश्यक ती पावले उचलली जातील, असे प्राधिकरणातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेवरून मोठ्याप्रमाणात राजकारण देखील होताना पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे पारडी उड्डाणपुलाचे काम मेसर्स गॅनन डंकर्ले अँड कंपनी लिमिटेड आणि मेसर्स एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संयुक्तरीत्या करत आहे. पूर्व नागपूरच्या या निर्माणाधीन पारडी उड्डाणपुलाच्या कळमना ते एचबी टाऊन या मार्गावरील एक भाग सेगमेंट १९ ऑक्टोबरच्या रात्री ९ च्या सुमारास पिलर पी ७ वरून सरकला आणि जमिनीवर पडला. पडलेल्या सेगमेंटचे दुसरे टोक अजूनही पिलर पी ८ वर आहे. तथापि, या घटनेचे कारण कळाले नसून प्रथमदर्शनी सेगमेंटच्या खाली असलेले बेअरिंग्ज खराब झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज आहे. मात्र, तज्ज्ञ तांत्रिक समितीच्या सविस्तर तपासणीनंतर नेमके कारण कळणार आहे. सध्या या पिलरच्या ठिकाणी कोणतेही काम केले जात नव्हते.
या पुलाचा पी ७ – पी ८ मधील सेगमेंट २० जानेवारी-२०१८ रोजी आणला असून, १३ एप्रिल २०१८ रोजी बसविण्यात आला आहे. हा सेगमेंट ५५ एमएम, काँक्रिट ग्रेडचा होता आणि जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत कोणत्याही बिघाडीचे संकेत मिळाले नाही. उभारणीच्या वेळी सर्व चाचण्या प्राधिकरण अभियंत्यातर्फे घेतल्या असून, सध्या त्या ठिकाणी कोणतेही काम प्रगतिपथावर नव्हते.अशी माहिती देखील समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- उद्यापासून नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार, मात्र ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- विराट कोहलीच्या ‘या’ कृत्यामुळे रोहितची झाली फजिती, क्रिकेटप्रेमींकडून होतेयं टीका
- हातातील कॉफी मगमुळे करीना टिकेस पात्र; व्हिडीओ झाला व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
