🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेत्री करीना कपूर खान ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी भरपूर टिका केली आहे.
या व्हिडीओत करीनाने क्रिम कलरचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. करीना बिल्डिंगच्या बाहेर येत असल्याचे दिसते. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे तिच्या हातात असलेल्या कॉफीचा मगने वेधले आहे. करीनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्या ट्रोल केले आहे. करीनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. ‘ही आज काल कप हातात घेऊन का फिरते.’ , कॉफी जर गाडीत पिण्याची वेळ येत असेल तर, एवढं मोठ घर काय कामाचं आहे’, अशा बऱ्याच कमेंट करत करीनाला ट्रोल केलं आहे.
https://www.instagram.com/tv/CVPK2PlIyyE/?utm_source=ig_web_copy_link
करीना लवकरच लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूडच चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या व्यतिरिक्त करीना ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार असून करीनासोबत रणवीर सिंह, विकी कौशल, आलिया भट्ट, भूमि पेडनेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर दिसणार आहेत. करीनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. करीनाचा हा व्हिडीओ पभयानीने शेअर केला असून या व्हिडिओला लाखो चाहत्यांकडून लाईक, कमेंट येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- जेम्स पॅटिन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली तडकाफडकी निवृत्ती
- देशात आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा होणार पार ; देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
