Share

विराट कोहलीच्या ‘या’ कृत्यामुळे रोहितची झाली फजिती, क्रिकेटप्रेमींकडून होतेयं टीका 

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे दोन मोठे खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील मतभेदाच्या बातम्या येत राहतात. आयसीसी टी -20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ बुधवारी दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी उतरला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून आलेला रोहित नियमित कर्णधार विराटमुळे नाराज झाला. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी विराटबद्दल राग काढून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

टी -20 विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरला, तेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी रोहितच्या हातात होती. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने येथे सांगितले की त्याच्या संघातील तीन मोठ्या खेळाडूंना या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तो म्हणाला की कोहली, बुमराह आणि शमी या सामन्यात खेळत नाहीत. आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की जेव्हा संघ मैदानावर आला तेव्हा विराट देखील उर्वरित खेळाडूंसह रोहितच्या अगदी मागे मैदानावर पोहोचला.

नाणेफेकीच्या वेळी रोहितने स्पष्टपणे सांगितले होते की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात विराटला विश्रांती देण्यात आली आहे. रोहितने कर्णधार म्हणून नाणेफेक करताना जे काही सांगितले ते त्याने संघाच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतरच सांगितले असते. विराटला या सामन्यात खेळण्याची गरज नव्हती हे स्पष्ट आहे. सर्वांसमोर, रोहितने विराट विश्रांती घेणार असल्याचे जाहीर केले, पण पुन्हा सर्वांच्या मागे फिल्डिंग लावून त्याने रोहितला अस्वस्थ केले. विराटमुळे या सामन्यात रोहितला त्रास सहन करावा लागला. विराटने केलेल्या या कृत्यामुळे सर्वत्र त्याच्यावर टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!