Share

INC | “एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्यामध्ये निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर सगळे पक्ष त्या तयारीला लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर विरोधपक्षनेत्यांवर आरोप-प्रत्यारोपांची खेळी देखील सुरू झाली आहे. गुरूवारी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas GOrantyal) यांच्यावर टीका केली होती. अशातच गोरंट्याल यांनी सत्तार यांच्यावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले कैलास गोरंट्याल ?

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांना अब्दुल सत्तारांपासून धोका असल्याचा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. गोरंट्याल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अब्दुल सत्तार हे सत्तेतील मीठाचा खडा आहे. एकनाथ शिंदेंना भाजपा, शिवसेना अथवा उद्धव ठाकरेंपासून नाहीतर, अब्दुल सत्तांरांपासून धोका आहे. अब्दुल सत्तार गद्दार असून, कोणाचेही नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की, एवढ्या सर्व लोकांनी त्यांना आशीर्वांद दिला, त्यांचे झाले नाहीत. एकनाथ शिंदे कोण आहेत?.

तसेच, अब्दुल सत्तार यांना विधानपरिषदेवर मी पाठवले. माणिकदादा पालोतकर यांनी नगराध्यक्ष, मी आमदार, अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मंत्री केलं, त्यांचे ते झाले नाही. विलासराव देशमुख आणि नारायण राणेंचे (Narayan Rane) सुद्धा ते झाले नाहीत. बिचाऱ्या एकनाथ शिंदे यांचे कसं होणार? जिकडे डम-डम उधर हम, असं अब्दुल सत्तारांचं असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!