नवी दिल्ली : शेंगदाणे विकून पोट भरणारा भुवन बड्याकर हा आता सेलिब्रिटी झाला आहे. होय, शेंगदाणे विकत असताना लोकांचं लक्ष वेधण्यासाठी त्याने ‘कच्चा बादाम’ हे गाणं बनवलं. कुणीतरी तो गात असतानाचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला आणि झालं. भुवनचं हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या गाण्यानं वेड लावलं. लोक या गाण्यावर रिल्स करू लागले. या एका गाण्यामुळे भुवनचं तर अख्खं आयुष्यच बदलून गेलं.
काही दिवसांपूर्वीच भुवनच्या कारला अपघता झाला होता. कार चालवणं शिकत असताना त्याची कार भिंतीवर आदळली होती. यात त्याला दुखापत झाली होती, पण आता तो बरा आहे. आता काय तर स्वत:च्याच अपघातावर त्याने नवं गाणं तयार केलं आहे. ‘अमार नूतन गाडी’ अर्थात माझी नवीन गाडी अशा आयशाच्या या गाण्यात त्याने त्याच्या अपघाताची संपूर्ध कहाणी सांगितली आहे. शिवाय देवाने आपल्याला कसं वाचवलं, याचा अनुभवही मांडला आहे.
‘कच्चा बादाम’या गाण्यामुळे भुवनचं पार आयुष्यच बदलून गेलं. एका लहानशा खेड्यात शेंगदाणे विकणारा हा व्यक्ती आता चक्क एका म्युझिक अल्बममध्ये थिरकताना दिसत आहे. त्याच्या गाण्याचा रिमेक वर्जन तयार करण्यात आला आहे आणि यामध्ये भुवन हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. तो सुंदर सुंदर मॉडेल्ससोबत डान्स करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :


