मुंबई: महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेच तेलंगणा राज्याची निर्मीती झाली. तेलंगणाची जनता संपूर्ण आयुष्यभर शरद पवार यांचे उपकार विसरणार नाही, अशा भावना के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केल्या.
भाजपविरोधात देशभरात आघाडी निर्माण करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेते प्रकाश राज, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
साहाच्या निवडप्रकरणी गांगुलीनंतर आता राहुल द्रविड वादाच्या भोवऱ्यात
“शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने…”,संजय राऊतांचे कॉंग्रेस आघाडीबाबत मोठे वक्तव्य
“ ते म्हणाले होते, मी असे पर्यंत तुझे संघातील स्थान अढळ मात्र..” ; साहाचा गांगुलीबाबत मोठा खुलासा
“चारीमुंड्या चीत करूनच पाटील नावाचा नाही निघाला तर…”, गुलाबराव पाटलांचे खडसेंना थेट आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

