औरंगाबाद : महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम भरण्याचा तगादा लावताच अनेक जण धनादेश देऊन अधिकाऱ्यांची बोळवण करतात. मात्र संबंधित बँकेत पुरेशी रक्कम असल्याने धनादेश वाटत नाही. वर्षानुवर्षे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे खात्यावर पुरेशी रक्कम नसताना धनादेश देणाऱ्यांना चाप लावण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मनपाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. तेव्हापासून धनादेश न वटल्यास चे प्रमाण घटले आहेत असे असले तरी गेल्या सहा महिन्यात ५१४ धनादेश वटले नाहीत. त्यातील १२५ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी अनेक मिळकतधारकांच्या धनादेश देऊन स्वतःची सुटका करून घेतात. मात्र त्यानंतर अनेक धनादेश वाटतच नाही. कारवाई टाळण्यासाठी अनेक जण महापालिकेच्या पथकाची धनादेश देऊन बोळवण करत आहेत. अनेकांचे धनादेश बॅंकेत अपुरी रक्कम, चुकीची सही केली. अक्षरी रक्कम वेगळी व अंकातील रक्कम वेगळी, तारखेत चुका असणे, नॉन सीएसटीची धनादेश देणे, शाई बदल असणे, धनादेशावर सही नसणे अशी कारणे धनादेश न वटण्यामागची आहेत.
जानेवारी २०२१ पासून सहा महिन्यात ५१४ चेक बाउन्स झालेले आहेत. त्यातील काही जणांनी रकमेचा भरणा केला नाही. दरम्यान प्रशासनाने १२५ जणांविरोधात चेक बाउन्स प्रकरणात कारवाई केली आहे. एकूण २ कोटी ४६ लाख रुपये होते. त्यासर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर ३८९ जणांनी त्यांच्याकडे असलेल्या करासह दंडाच्या रकमेचा देखील भरणा केला आहे. असे कर संकलन विभागातर्फे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- १५ हजार लसींचा साठा दोनच दिवसात संपला! औरंगाबादेत जम्बो लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक
- पीएचडी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, ऑनलाइन नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ!
- औरंगाबादकरांना आठवड्यातून दोनदा पाणी, पालकमंत्र्यांची घोषणा ठरली निव्वळ स्टंटबाजी!
- मराठा आक्रोश मोर्चा : ‘आता तारीख देणार नाही, थेट ऍटॅक करू’; नरेंद्र पाटलांचा इशारा
- केंद्र सरकारशी पंगा अंगलट ; ट्विटर विरोधात पाचवा गुन्हा दाखल


