🕒 1 min read
मुंबई: कर्नाटकातील कुंदापूरच्या प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये (denies admission to hijab-wearing girls at Kundapur Pre-University College in Karnataka) हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. हिजाब परिधान करून वर्गात जाणाऱ्या मुस्लिम मुलींचा निषेध म्हणून बुधवारी कर्नाटकातील दोन महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भगवा स्कार्फ घातल्यानंतर ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. याचा व्हिडिओही सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला आहे.
“तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरुनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान कर्नाटकात भाजपचे बसवराज बोम्मई (,Chief Minister Basavaraj Bommai) यांचे सरकार असून महिन्यातील ही दुसरी घटना येथे घडली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने यावरून भाजपला निशाण्यावर धरल्याचे दिसून येत आहे.
तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरुनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?#Karnataka
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2022
नेमके प्रकरण काय?
काही महिन्यापूर्वी उडुप्पीच्या सरकारी महाविद्यालयात हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेश नाकारण्यात आल होता. आता कुंदापूरच्या प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्येही मुस्लिम मुलींना गुरुवारी प्रवेश नाकारण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य रामकृष्ण (College Principal Ramakrishna) यांनी स्वतः विद्यार्थ्यांना कॉलेजच्या गेटवर उभे राहून थांबवले. वर्गात डोक्यावर स्कार्फ घालायचे असल्यास वर्गात येऊ नका, असे त्यांनी म्हटले. दरम्यान हिजाब परिधान करून वर्गात जाणाऱ्या मुस्लिम मुलींचा निषेध म्हणून बुधवारी कर्नाटकातील दोन महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भगवा स्कार्फ घातल्यानंतर ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे.
तसेच विद्यार्थिनींनी हिजाब घालण्यावर अचानक बंदी का घातली आहे हे जाणून घेण्याची मागणी केली. कारण यापूर्वी असे कोणतेही नियम नसल्याचे त्यांनी म्हटले. यावर रामकृष्ण यांनी सांगितले की, ते शिक्षणाचा अधिकार नाकारत नाही, परंतु महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आणि कुंदापूरचे आमदार हलादी श्रीनिवास शेट्टी (Chairman of College Development Committee and Kundapur MLA Halady Srinivas Shetty) यांच्या निर्देशानुसार ते काम करत आहेत. मुख्याध्यापकांनी सांगितले की शेट्टी यांनी त्यांना सांगितलेल्या गणवेशाच्या इतर कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त पोशाखांना परवानगी न देण्याचे निर्देश दिले होते.
पाहा व्हिडिओ-
दरम्यान यानंतर शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती येथील एम विश्वेश्वरैया सरकारी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात काही हिंदू विद्यार्थ्यांनी बुधवारी भगव्या शालीत वर्गात हजेरी लावली आणि मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब परिधान केल्याचा निषेध केला.
महत्वाच्या बातम्या:
- पाकिस्तान सुपर लीगमध्ये शाहिद आफ्रिदीने बनवला लज्जास्पद रेकॉर्ड
- “आमची सत्ता आल्यास अनेकांना जेलची हवा खावी लागेल”, एकनाथ खडसेंचा दावा
- “इथं न्याय होणार! ही महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई, बंडाविरुद्ध बंड होणार”, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया
- ‘त्या’ वक्तव्यानंतर बंडातात्या कराडकरांवर साताऱ्यात गुन्हा दाखल
- राजकीय नेत्यांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर बंडातात्या कराडकरांनी मागितली माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
