Share

पाकिस्तान सुपर लीगमध्ये शाहिद आफ्रिदीने बनवला लज्जास्पद रेकॉर्ड

Published On: 

मुंबई: पाकिस्तान सुपर लीग २०२२ च्या १० व्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडने क्वेटा ग्लॅडिएटर्सचा ४३ धावांनी पराभव केला. पाकिस्तान सुपर लीगमधील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सुद्धा खेळत आहे. आफ्रिदीच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत मात्र त्याने या स्पर्धेत अजून एक पण लज्जास्पद रेकॉर्ड केला आहे.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचा भाग असलेल्या शाहिद आफ्रिदीने ४ ओव्हर मध्ये ६७ धावा दिल्या. ज्यात त्याला फक्त एक विकेट घेता आली. पीएसएलमध्ये शाहिद आफ्रिदीचा हा पहिलाच सामना होता. पाकिस्तान सुपर लीगच्या इतिहासात कोणत्याही सामन्यात ४ ओव्हरमध्ये शाहिद आफ्रिदीपेक्षा जास्त धावा कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या नाहीत.

शाहिद आफ्रिदीच्या आधी इस्लामाबाद युनायटेडच्या जफर गौहरच्या नावावर होता. पीएसएलच्या ९व्या हंगामात अबुधाबीमध्ये पेशावर जाल्मी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जफर गौहरने ४ ओव्हर मध्ये ६५ धावा दिल्या होत्या. मात्र हा लाजिरवाणा विक्रम आता शाहिद आफ्रिदीच्या नावे झाला आहे. झालेल्या सामन्यात इस्लामाबादच्या २२९ धावांचे पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्सचा संघ १८६ धावांत सर्वबाद झाला होता . इस्लामाबाद युनायटेडकडून शादाब खानने ४ ओव्हरमध्ये २८ धावा देत ५ बळी घेतले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!