Aditya Thackeray | मुंबई : जवळपास १ महिना होत आलं राज्यात अजूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकार टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे वारंवार सरकारला मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही याबाबत प्रश्न विचारत आहे. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात 32 दिवस पाच लोकांचंच मंत्रिमंडळ होतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. यानंतर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले कि, दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आपल्या महाराष्ट्रात आहे, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावला आहे. कायदेशीर लढाईबाबतीत भाष्य करताना, कायद्याप्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे, असंही ते म्हणाले. तसेच पुढे 40 आमदारांच्या मनात जो राग-द्वेष दिसतो, तो नक्की कशामुळे आहे. त्यांना पक्ष प्रमुख व पक्षाने जे काही दिले आहे. ते सर्व देऊन देखील आम्ही अशी काय चूक केली की ज्यामुळे यांनी पाठीत खंजीर खुपसला. जी काही सत्ता आली ती त्यांना प्रथम मिळाली. फंड, निधी प्रथम मिळाला. मग चूक आम्ही काय केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी ते निष्ठा यात्रेनिमित्त मानखुर्द येथे बोटात होते. तसेच माझ्या मनात राग नाही आणि कोणत्याच शिवसैनिकांच्या मनातही पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल राग नाही. मात्र ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली त्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसाला याचं दुःख आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. मात्र या यात्रेदरम्यान, त्यांनी शिंदे गटाला निशाण्यावर धरलं आहे.
दरम्यान, अजित पवारांनी देखील नागपूर दौऱ्यादरम्यान टीका केली आहे. राज्यात 32 दिवस पाच लोकांचंच मंत्रिमंडळ होतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. यावर पवार म्हणाले कि, आमच्या सरकारमध्ये पाच नाही तर सात मंत्री होते. तसेच हे सर्व मंत्री मुख्यमंत्रीपदाच्या ताकदीचे होते, असं सांगतानाच त्यांनी यांनी ठाकरे सरकारमधील सुरुवातीच्या सात मंत्र्यांची यादीच वाचून दाखवली. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, यांनी शपथ घेतली होती. यातील काहीतर मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशी माणसे होती.
महत्वाच्या बातम्या :
- Aaditya Thackeray | अजाणचा आवाज ऐकताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण; व्हिडीओ व्हायरल
- Navneet Rana | नवनीत राणांचा जीव धोक्यात! राजस्थान सीमेवरून आलेल्या लोकांनी केली घराची रेकी
- ambadas danve । महाराष्ट्राला लाभले दिल्लीत मुजरा करणारे मुख्यमंत्री – अंबादास दानवे
- Suresh Navale | “अर्जुन खोतकर ३१ तारखेला शिंदे गटात प्रवेश करणार”; सुरेश नवले यांचा खुलासा
- Sanjay Raut । माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेने सोबतच राहणार – संजय राऊत


