Share

Aaditya Thackeray | अजाणचा आवाज ऐकताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत सेनेचे 40 आमदार फोडले. त्यानंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या धक्क्यातून कोलमडलेली शिवसेना आता सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आली आहे. तर शिवसेनेची मोट नव्याने बांधण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकतेच शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांचे दौरे केले. त्यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यातच आता आदित्य ठाकरेंचा निष्ठा यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत आहे. ज्यात ‘अजाण’ चा आवाज ऐकताच आदित्य ठाकरे भाषण थांबवतात.

या व्हिडिओत पाहायला मिळत आहे कि, आदित्य ठाकरे हे भाषण करत आहेत. त्याचवेळी अजाण सुरु होते. आजचा आवाज ऐकताच आदित्य ठाकरे भाषण करायचे थांबवतात आणि शांतपणे उभे राहतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून त्यांचा इतर धर्मा प्रती असलेला आदर दिसून येतो. अशा घटना अनेक वेळा घडल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक नेत्यांच्या भाषणावेळी अजाण सुरु होते आणि नेते मंडळी भाषण करायचे थांबवतात. तसंच आदित्य ठाकरेंनीही केलं.

अशी एक घटना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणादरम्यानही झाली होती त्यावेळी मात्र त्यांनी हे भोंगे बंद करा असा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सत्तेत असताना मनसे आणि भाजपने मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी लावून धरली होती. मात्र सत्तापरिवर्तन झाल्यांनतर या मागणीचा मसनेला विसर पडला आहे, असंच म्हणावं लागेल.

शिवसेनेला आणखी एक धक्का
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. महाराष्ट्रात सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यातही ते अपयशी ठरताना दिसत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील उपनेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली होती. अर्जुन खोतकर यांचा जालना जिल्ह्यात चांगला प्रभाव मानला जातो. खोतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर अर्जुन खोतकर लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे छावणीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र खोतकर यांनी याबाबत अजून घोषणा केली नाही. दरम्यान औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची वेळही जाहीर करून टाकली आहे. तसेच त्यांच्या या विधानाला माजी मंत्री सुरेश नवले यांनी देखील दुजोरा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!