Share

Sanjay Raut । माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेने सोबतच राहणार – संजय राऊत

Published On: 

Sanjay Raut । मुंबई : शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत हे चागंलेच आक्रमक झाले आहेत. सध्या राऊतांच्या निशाण्यावर शिंदे गट आहे. राऊत शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसेच या आधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे नेते दाबामुळे त्यांच्यासोबत आहेत. कोण कोणत्या कारणासाठी शिंदेंसोबत गेलं आहे हे आम्हांला माहित आहे, असं राऊत वारंवार सांगत आहेत. सध्या संजय राऊत यांना ईडीच्या नोटीस आल्या आहेत. त्यावरून त्यांनी आता विरोधकांना इशारा दिला आहे.

दिल्लीच्या वाऱ्या फेऱ्या सुरू आहेत अजून मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाही. यातून वेळ काढत मुख्यमंत्री महाराष्ट्र फिरत असतील तर त्यावर टीका करण्याचे कारण नाही. मंत्रिमंडळ का रखडलं हे हम दो और हमारे दो सांगू शकतात. राजकीय दबावासाठी हे सगळं चालु आहे. पुन्हा समन्स आल्यावर पाहू. माझा आवाज बंद करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. संजय राऊत काय आहे हे दिल्लीपासुन गल्लीपर्यंत सगळ्यांना माहित आहे. माझ्यावर किती ही दबाव आला तरी हा संजय राऊत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेने सोबतच राहणार गुडघे टेकणार नाही, असं म्हणालेत.

पुढे यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, लीलाधर डाके, मनोहर जोशी अनेक कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले आहेत. डाके आणि जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अशा कडवट निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोणाला भेटत असतील तर स्वागतच केले जाईल. मात्र एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्ती करत आहेत, त्यांना काय अधिकार आहे. पोरखेळ चालू आहे फक्त आम्ही याला गांभीर्याने पाहत नाही, असं ते म्हणाले.

बाळासाहेबांनी वाढवला वृक्ष ज्या सावली मध्ये आपण मोठे झालो, फळ खाल्लीत. तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व दाखवा. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं. पण आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. मात्र मिळेल त्या मार्गाने नाही. राज्यात सत्तांतर होईल या माझ्या मताशी मी ठाम आहे. ठीक आहे कोणाला हे स्वप्न वाटत असेल. पण लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता आणायची आहे, ती वेळ लवकरच येईल, असं म्हणत राऊतांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!