🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. पक्षाचे नेते आणि विधानसभेतील उपनेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली होती. खोतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर अर्जुन खोतकर लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे छावणीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र खोतकर यांनी याबाबत अजून घोषणा केली नाही. मात्र औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची वेळही जाहीर करून टाकली. तर त्यांच्या या विधानाला माजी मंत्री सुरेश नवले यांनी देखील दुजोरा दिला आहे.
अब्दुल सत्तार, सुरेश नवले आणि अर्जुन खोतकर हे तिघेही सध्या दिल्लीत आहेत. सत्तार हे खोतकर यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र सदन होते. त्यांनतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासंदर्भात खोतकरांशी चर्चा केली. त्यानंतर हे तीनही नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहचले. तिथे त्यांनी शिंदेंशीही चर्चा केली. त्यावेळी तिथे खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या भेटीनंतरच खोतकरांचे पारडे शिंदे गटाकडे झुकल्याचं स्पष्ट होत आहे.
दरम्यान सुरेश नवले यांच्याशी माध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले कि, “अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात येत्या 31तारखेला एक कार्यक्रम आहे.त्यावेळीच मी आणि अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार आहोत.” तर यासंदर्भात बोलताना खोतकर म्हणाले कि, “अब्दुल सत्तार हे माझे मित्र, सहकारी आणि भावासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्यात काही गैरही नाही. आम्ही इतकी वर्ष पक्षात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अशा अपेक्षा आहेत. पण माझ्या निर्णयाबद्दल विचार विनिमय करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा बैठक घेणार आहोत. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी चर्च करूनच मी माझा अंतिम निर्णय स्पष्ट करणार आहे.”
खोतकर आणि दानवे संघर्षाचे काय होणार
भाजपमध्ये दाखल झालेल्या शिंदे यांना पाठिंबा द्यावा लागला तर मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधातील संघर्षाचे काय होणार, असा प्रश्न खोतकरांसमोर निर्माण झाला. आता एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी मनधरणी केल्याचे वृत्त आहे. अर्जुन खोतकरही काही दिवसांपासून ईडीच्या निशाण्यावर आहेत. अशा स्थितीत तपास टाळण्यासाठी ते उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit pawar | अडेलतट्टूपणाची भूमिका न घेता सर्वोतोपरी मदत करावी- अजित पवार
- Sanjay Raut । स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व दाखवा; संजय राऊतांच शिंदेंना आव्हान
- Abdul Sattar | अब्दुल सत्तारांना अर्जुन खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! म्हणाले…
- Sanjay Raut । “जनतेत जाऊन सत्ता परिवर्तन करणार”; संजय राऊत पुन्हा आक्रमक
- Abdul Sattar । तीन तारखेच्या आत गॅरींटीने सांगतो मंत्रीमंडळाचा विस्तार होईल – अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
