Share

दिल्ली कॅपीटल्सनंतर ‘या’ दोन संघाचे कर्णधार बदलले जाणार

Published On: 

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यादरम्यान शनीवारी २९ मे रोजी बीसीसीआयने स्पर्धेतील उर्वरीत सामन्याची घोषणा करुन सर्व चर्चांना पुर्णविराम दिला.

आयपीएल स्पर्धेचे उर्वरीत सामने हे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे आयोजीत करण्यात येणार आहे. आयपीएल २०२१ च्या पुर्वार्धात दिल्ली कॅपीटल्सचा नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर हा जखमी असल्यामुळे रिषभ पंतने कर्णधारपद भुषवले होते. मात्र सप्टेंबर पर्यंत अय्यर दुखापतीतून सावरुण जाईल त्यामुळे रिषभ पंतचे कर्णधारपद काढुन पुन्हा अय्यरला देण्यात येईल. याव्यतीरिक्त केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद या संघाचे कर्णधारपद बदलले जाण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या उर्वरीत सामन्याच्या वेळी न्युझीलंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळे हैदराबाद संघाचा नवनिर्वाचीत कर्णधार केन विल्यमसन हा उर्वरीत हंगामात उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद पुन्हा डेव्हीड वॉर्नरकडे दिले जाऊ शकते. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार इयान मॉर्गन दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध असु शकत नाही. कारण यादरम्यान इंग्लंडच्या संघाचे वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे इतर खेळाडूप्रमाणे तोही उपलब्ध नसल्यामुळे कर्णधारपद पुन्हा दिनेश कार्तिकला किंवा नितीश राणाला दिले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!