बीड: गेवराईमध्ये अल्पवयीन मुलगी, तर आष्टीमध्ये वनरक्षकाने घेतला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे गेवराईसह आष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण जरी अस्पष्ट असले तरी या प्रकरणी तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून यावर समुपदेशन करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे.
जिल्ह्यात चोवीस तासांत दोन जणांनी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोन्ही आत्महत्यांची कारणे अस्पष्ट आहेत. गेवराई तालुक्यात १७ वर्षीय मुलीने, तर आष्टी तालुक्यात ३२ वर्षीय वनरक्षकाने गळफास घेतला. गेवराई तालुक्यातील पाचेगाव जवळील जयराम तांड्यावरील दीक्षा सुभाष राठोड (१७) या युवतीने शनिवारी राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन गेवराई पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसरी घटना आष्टी तालुक्यात घडली. ब्रह्मगाव परिक्षेत्राचे वनरक्षक अनिल बाबासाहेब जगताप (३२) यांनी श्रृंगेरी देवी मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ते ब्रह्मगाव वन परिक्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्याही आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
महत्वाच्या बातम्या
- महेश मांजरेकर पुन्हा बायोपीककडे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जिवनपट उलगडणार मोठ्या पडद्यावर
- देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- मोठी बातमी : बारावीच्या परीक्षा होणार की नाही ? सर्वोच्च न्यायालय दोन दिवसात देणार निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

