Share

पाकिस्तानचा सलग तिसरा विजय; अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव

Published On: 

दुबई: ट्वेन्टी-२० विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने सलग तिसरा विजय प्राप्त केला. यासह पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला.

अफगाणिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९ षटकांत पूर्ण केले. गाठले. त्यामुळे आता पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठण्यासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. दरम्यान या सामन्यात मोहम्मद रिझवान ८ धावांवर बाद झाला. मात्र, आझम आणि फखर झमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी ६३ धावांची भागीदारी रचली. तर रशीद खानने मोहम्मद हाफिज आणि आझम यांना माघारी पाठवले. परंतु आसिफ आणि शोएब मलिक यांनी मोठे फटके मारत पाकिस्तानला विजय प्राप्त करून दिला.

दरम्यान अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १४७ अशी धावसंख्या केली. पाच गडी ६४ धावांत गमावल्यानंतर मात्र नजीबुल्ला झादरानने २२ धावा काढत चांगली फलंदाजी केली. आणि कर्णधार नबी नाबाद ३५ आणि गुलबदिन नैब नाबाद ३५ अशी ७१ धावांची भागीदारी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!