दुबई: ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या गटात अग्रस्थानी असलेला इंग्लंड संघ आणि ऑस्ट्रेलिया हे कट्टर प्रतिस्पर्धी आज सलग तिसऱ्या विजयासाठी आज झुंज देणार आहेत. उभायी संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे आजचा सामना चुरसीचा असणार आहे.
ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने सलग वेस्ट इंडिज आणि बांगलादेशलापराभूत करत धूळ चारली आहे. जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर या धडाकेबाज फलंदाजांनी इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिकाबजावली आहे.
तर अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली असलेल्या ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर फिरकीपटू अॅडम झम्पा यांची खेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका ठरत आहे. दरम्यान आज सायंकाळी ७.३० वाजता उभायी संघांत सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विंडीजचे आव्हान कायम; बांगलादेशवर रोमहर्षक विजय
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- ‘होय मी भंगारवाल्याची मुलगी’, मलिकांच्या मुलीने ट्वीट करत दिले टीकाकारांना प्रत्युत्तर
- ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील- छगन भुजबळ
- ‘शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात सत्तेची लॉटरी लागली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

