Share

“…हा सत्याचा विजय”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर जे.पी.नड्डा यांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. एकीकडे भाजपकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा(JP Nadda) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात जे.पी.नड्डा यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारची लोकशाहीविरोधी कामे थांबवणे हा सत्याचा विजय आहे. मी सर्व १२ आमदारांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकारच्या असंवैधानिक कारभाराविरोधात भाजप आवाज उठवत राहील. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी वर्गाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत. भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या अंतर्गत जनतेच्या हक्कांसाठी भाजप नेहमीच लढत आहे’, असे नड्डा म्हणाले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने तसेच शिवीगाळ केल्याने आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणीया १२ आमदारांचे (suspension of 12 BJP MLAs) ५ जुलै २०२१ रोजी निलंबन करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!